...तहसिलदार आवारातली कामं आटोपून परतत असताना वाटेत अचानक एक कुत्रं दिसलं गळ्याजवळ वितभर रुंदीचा आणि खूप खोल खड्डा पडला होता . ते बघून मला अंगावर काटा आला ...माझ्या हृदयात चर्र झाले . त्याच्याजवळ थांबून लगेच पशुवैद्यकिय दवाखान्यातील डॉ . ढेकळे यांना फोन लावून परीस्थिती सांगितली . ते म्हणाले , दवाखान्यात या बघुया काय करायचं ते ! दवाखान्यात गेलो तर कुत्रं कुठंतरी निघून जाईल , म्हणून बाजूच्या फुलंविक्रेत्याकडं माझा फोन नं दिला आणि मला तशी खबर द्यायला सांगितलं . डॉक्टरांशी बोललो . संपूर्ण हकिकत ऐकल्यानंतर ते यायला तयार झाले . मी म्हटलं , ' तिथून ते दुसरीकडं गेलं असल्यास , जिथं सापडेल तिथून फोन करतो या तुम्ही ! ' या सगळ्या प्रक्रीयेत कुत्रं कुठंतरी गेलं होतं . त्याच्या जखमेत प्रचंड आळ्या पडल्या होत्या आणि माश्या त्याभोवती घोंघावत होत्या . त्या जखमेचा वास आजुबाजूने जाणाऱ्यांना सहन होत नव्हता ; त्यामुळं सगळे दुकानदार त्याला आपल्या दारातून हाकलत होते .
अशा जखमा झाल्यावर आत असणारे किडे किती भयंकर आणि वेदनादायी असतात ते मी अनेक मनोरूग्णांच्या बाबतीत पाहिले होते ! पण हा बोलू न शकणारा जीव कसं सहन करत असेल हे सर्व ... याला आत्महत्याही करता येत नाही . असंच जखम घेऊन निसर्ग देईल तेव्हा मरण स्विकारायचं ! मला यावेळी निसर्गाला शिव्याही आल्या तोंडात ! ... म्हणूनच हे कुत्रं एका ठिकाणी थांबू शकत नव्हतं ... थांबूही दिलं जात नव्हतं ! काहीच खाता पिता येत नसल्यामुळं त्याच्या अंगात अजिबात त्राण नव्हते !
अर्धा तास फिरत होतो , अनेक दुकानदारांना , लोकांना विचारलं ; दिसलं तर मला फोन करा म्हणून सांगितलं . एकाएकी मुख्य रस्त्याच्या कडेला पहुडलेलं दिसलं . लगेच डॉक्टरांना फोन लावला . डॉक्टर बाहेर गेले होते . ते येईपर्यंत अमन ह्या माझ्या विद्यार्थीमित्राला बोलावून घेतले . ( अशा प्रकारच्या कुठल्याही कामात मला अमनची खूप मदत होते . पण तो शाळेत असल्यामुळे हरेक वेळेला मी नाही बोलावत . पण हा मुलगा खूप संवेदनशील आहे ! )
डॉक्टर येईपर्यंत त्या कुत्र्यावर आम्ही नजर ठेऊन होतो . आजूबाजूनं जाणारी लोकं त्याच्याकडं बघून , थुंकून पुढे जात होती . एक माणूस तर अक्षरशः त्याच्या अंगावर थुंकला ... प्रचंड राग आला मला ... पण मला आतनं खूप कासावीस वाटायला लागलं . ती जखम आता फक्त त्या कुत्र्याची राहिली नव्हती ... आता लोक माझ्याच अंगावर थुंकत असल्यागत मला वाटू लागले होते . मी कुणाचाही प्रतिकार करत नव्हतो . माझ्या पोटात रखरखत होतं ... म्हणून डॉक्टर येईपर्यंत प्रचंड कासावीस होत होतो !
डॉक्टर आले . जखम बघून त्यांनी माझ्याकडे जो कटाक्ष टाकला त्यावरून मी काय ते ओळखलं ! मग त्या कुत्र्याला तसंच ठेवणं मला मान्य होईना . चर्चा झाली . आणि नाईलाजास्तव त्याला वेदनेतून मुक्त करावे इथंपर्यंत आम्ही पोहोचलो . डॉक्टर आणि त्यांच्या सहाय्यकांपैकी कुणीच या गोष्टीसाठी तयार होत नव्हते . खूप वेळ मी त्यांना समजावले ... मग ते तयार झाले ! पण भर बाजारपेठेत हा ' उपचार ' करता येणं शक्य नव्हतं . सायकल गाड्यात घालून दवाखान्यापर्यंत नेऊन उपचार करायचं असं ठरलं . मग गाड्याचा शोध सुरु झाला . प्रत्येकाच्या गाड्याचं काहीतरी खराबी , नाहीतर काम निघालं होतं ! शेवटी मग फरीदादिदिंच्या घरातून गाडा आणला . कपौंडर अमोलभाऊ आणि मी त्याचे पाय बांधून , हलकेच उचलून गाड्यात घातले . त्याने अगदी थोडा प्रतिकार केला . मग अमन त्या गाड्याला धरून गाडीवर उलटा बसला . आणि आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन आलो . अशा प्रकारचा ' उपचार ' माझ्या आयुष्यात मी पहील्यांदाच करणार होतो ... मला भिती वाटत होती ! नीट व्हावं असं मधूनच वाटत होतं . कुत्र्याने प्रतिकार करणं सोडून दिलं होतं . डॉक्टर सलाईनसारखं एक मोठ्ठं इंजेक्शन घेऊन आले . खूप वेळ शीर सापडेना , मला त्याच्या तोंडावरचा हात काढणं शक्य नव्हतं . इतक्या वेळा खुपसलेल्या सुयांचा कुत्र्यावर काहीच परीणाम होत नव्हता . त्याच्या आयुष्यातला हा असा हस्तक्षेप त्याला सोसवला असेल असं माझ्या मनात चमकून गेलं . कारण या क्षणापर्यंत ' हाच् आणि हाड् ' अशीच त्याची दखल लोक घेत होते . ... शेवटी शीर सापडली . सलाईन चढवलं ... एकाच मिनिटात सुखाच्या जांभईसारखं शरीर त्यानं ताणलं आणि त्याच्या हृदयाचे ठोके हळूहळू मंदावत गेले ... माझा हात त्याच्या हृदयावरच होता ! मला त्याचं ते तसं शांतपणे पडून राहणं बरंच वाटलं ; पण डोळेही पाणावले होते ... आत्ताही पाणावले !
रात्रभर झोप लागली नाही . पहाटे केव्हा तरी लागली असेल ...
पण माझ्या अंगावर थुंकलेल्या ' त्या ' माणसाला मी आता शोधणार आहे ...